Pune Crime: शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटारी चोरणारी टोळी गजाआड

Pune Crime Latest News: तारा विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Pune Crime: शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटारी चोरणारी टोळी गजाआड
Updated on

न्हावी सांडस व परिसरातील गावातील पाणी उपसा मोटारी व ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याचा तारा चोरणाऱ्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी पकडले. तारा विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकासह  सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

                                 मागील पंधरा दिवसात १५ मोटार व ट्रान्सफॉर्मर चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी शेतकऱ्यांनी फिर्याद दाखल केली होती. लोणी कंद पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी महेश लक्ष्मण धुमाळ, ( वय २९ वर्ष, रा. केडगाव, ता. दौंड ) याला ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली देवून साथीदारांची नावे सांगितली.

Pune Crime: शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटारी चोरणारी टोळी गजाआड
Pune Crime : मोबाईलवर गेम खेळताना डिस्टर्ब केल्यानं मित्रावर गोळीबार! पुण्यातला धक्कादायक प्रकार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com