
गुंड गजा मारणे याची मटण पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली आहे. पुणे पोलिस दलातील १ अधिकाऱ्यासह ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. गजा मारणेला पुण्याहून सांगली कारागृहात घेऊन जाताना मारणे याने पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मकोकाचा आरोपी असूनही ढाब्यावर पोलिस व्हॅन थांबवून त्याला मटण खाऊ दिल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिह्न उभे राहिले होते.