
Pune Crime News : महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे : महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुमीत बाळासाहेब जेधे (वय २६, रा. संगमवाडी, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीची या तरुणासोबत वर्षभरापूर्वी ओळख झाली.
या तरुणाने तिला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो असे सांगून आपल्या जाळ्यात ओढले. एका हॉटेलमध्ये त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने गोवा, लोणावळा, अलिबाग येक्षेही तिच्यावर अत्याचार केला. तसेच, युवतीचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, एक लाख ३८ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.