Pune Crime : पुण्यात पीएमपी बसमध्ये महिलांच्या दागिन्यांची चोरी, पोलिस तपास सुरू
PMPML Theft : पीएमपी बसमधून प्रवास करत असलेल्या महिलांकडील दीड लाखांहून अधिक किमतीच्या सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले; एका दिवसात तिन्ही घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण.
पुणे : पीएमपीने प्रवास करत असलेल्या महिलांकडील दागिने चोरीच्या आणखी दोन घटना घडल्या आहेत. नगर रस्ता, विश्रांतवाडी, खडकी परिसरात या घटना घडल्या. चोरट्यांनी प्रवासी महिलांकडील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले.