
Summary
पुण्यात पत्नीने आई व भावाच्या मदतीने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचे अपहरण करून तिला बेदम मारहाण केली.
कारमध्ये दोन तास फिरवत पीडितेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन पीडितेची सुखरूप सुटका केली.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेनं पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून त्याच्या गर्लफ्रेंडसोबत भयानक कृत्य केले आहे. आई आणि भावाच्या मदतीने तिचे अपहरण केले . त्यानंतर तिला कारमध्ये दोन ते अडीच तास फिरवून बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली . या धक्कादायक प्रकारमुळे एकच खळबळ उडाली आहे.