
पुणे : वाकडेवाडीतील एका नामांकित दुचाकी शोरूममधील सुरक्षारक्षकाला कटरचा धाक दाखवून, तसेच त्याचे हातपाय बांधून शोरूममधील सात लाख ११ हजारांची रोकड चोरणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली. शोरूममध्ये स्टोअर कीपर असलेल्या तरुणानेच चोरी केल्याचे उघड झाले आहे.