

Manchar Crime News Silver Ornaments Pledged as Gold Pune Police Search for Accused in 9 Point 41 Lakh Loan Fraud Case
esakal
मंचर : सोन्याचे दागिने असल्याचे भासवून प्रत्यक्षात चांदीचे दागिने तारण ठेवत एका पतसंस्थेकडून ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अधिकारी राजेंद्र शिवराम गायकर (वय ६०, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.