
Gold Chain Theft
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा : मराठा आंदोलन रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेवून हातचलाखीने गळयातील सोन्याची चैन चोरणारा परजिल्हयातील सराईत आरोपीस आळेफाटा पोलीसांकडून अटक करून ५ लाख ७७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल केला जप्त याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२८ ऑगस्ट रोजी चालु असलेल्या मराठा आंदोलन रॅली वडगाव आनंद (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत आल्यानंतर शशीकांत नामदेव देवकर यांची दिड तोेळे वजणाची सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा दि.३१ रोजी दाखल करण्यात आला होता.