esakal | लोखंडी कोयत्याने एकावर हल्ला; दहशत माजवण्याचा प्रयत्न

बोलून बातमी शोधा

लोखंडी कोयत्याने एकावर हल्ला; दहशत माजवण्याचा प्रयत्न
लोखंडी कोयत्याने एकावर हल्ला; दहशत माजवण्याचा प्रयत्न
sakal_logo
By
टीम ई सकाळ

रामटेकडी : भावाचा खून केल्याचा राग मनात धरून दोघांनी लोखंडी कोयत्याने एकावर हल्ला केला. तर घरातील सामानांची तोडफोड केली. तसेच हत्यारे हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवार दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास स. नं. १०८/१०९, विश्वरत्न मित्र मंडळ शेजारी, रामनगर, रामटेकडी येथे घडली. याप्रकरणी दोघा जणांविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.लकीसिंग गब्बरसिंग टाक रा. रामटेकडी, हडपसर, पुणे व तौफिक शेख रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजू एकनाथ थोरात (वय ४४ रा. स. नं.१०८/१०९, रामनगर रामटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: पुण्यात आता देशीदारूही मिळणार घरपोच!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू थोरात हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत घरी असताना सायंकाळी साडे सहा दरम्यान आरोपी लकीसिंग गब्बरसिंग टाक व तौफिक शेख हे राजू थोरात यांच्या घरात घुसून “तेरा लडका किधर है, उसे जिंदा नही छोडूंगा, मेरे भाई के मर्डर में उसका भी हात हैं” असे म्हणत त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असतानाच तो हल्ला थोरात यांनी हुकवला, आणि तो वार घरातील फ्रीजला लागला. त्यामुळे फ्रीज चे नुकसान झाले. दुसरा आरोपी तौफिक शेख ह्याने लोखंडी हत्याराने घरातील टीव्ही, पाण्याचा माट, घरातील कपाटाची काच इत्यादी वस्तू फोडून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान केले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक भूषण पोटवडे व भोलेनाथ अहिवळे अधिक तपास करीत आहेत.