Bandu Andekar House Raid
esakal
Pune police raid Bandu Andekar’s house and seize crores : गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या धक्कादायक गोळीबाराने पुणे शहर हादरले आहे. या दिवशी १८ वर्षीय आयुष गणेश कोमकर याची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या वनराज आंदेकर हत्याकांडाशी जोडली जात असून, आंदेकर टोळीने बदला म्हणून आयुषला टार्गेट केल्याचा संशय आहे. अशातच आता पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांना कोट्यवधीचा मुद्देमाल मिळून आला.