

Police officials conducting a late-night raid operation in Budhwar Peth, Pune
esakal
Pune Budhwar Peth Raid: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात अवैध वास्तव्य आणि देहविक्रय व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे. फरासखाना आणि खडक पोलिस ठाण्यांच्या पथकांनी बुधवारी मध्यरात्री या परिसरात छापेमारी केली. या कारवाईत ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण २२ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.