
शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. एका नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्येच विद्यार्थ्यांमध्ये कोयत्यांनी आणि हातोड्यांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.