
पुण्यातील डॉ. दीपक महाजन हत्याकांड प्रकरणात जन्मठेप झालेल्या लीना अनिल देवस्थळी (वय ६५) यांची सुटका झाली. देवस्थळी यांनी १९ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ६० वर्षांवरील वयस्कर व अशक्त महिला बंदीजनांना मुक्त करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाच्या आधारे लीना देवस्थळीची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली.