Pune crime: धक्कादायक! मुलीने दुसऱ्या लग्नाला दिला नकार, नराधम बापने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune crime News

Pune crime: धक्कादायक! मुलीने दुसऱ्या लग्नाला दिला नकार, नराधम बापने...

पुण्यातची ओळख आता गुन्हेगारीचे शहर म्हणून व्हायला जास्त वेळ लागणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे शहरात आणि परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येत आहेत. अशातच पुण्यातील कर्वेनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वडीलांनीच पोटच्या 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर वडील दुसऱ्या लग्नाचा विचार करत होते. मात्र मुलगी दुसऱ्या लग्नाला विरोध करत होती. त्यानंतर वडीलांनीच मुलीचा विनयभंग केला असल्याची घटना समोर घडली आहे.

13 वर्षीय मुलीने या सगळ्या प्रकाराची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने पिडित मुलीचे वडील आणि आजीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत हा सगळा प्रकार 2020 पासून आजपर्यंत घडत असल्याचे म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 2020 पासून आजपर्यंत घडत असल्याचे म्हटले आहे. पिडित मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडीलांना दुसरं लग्न करायचे होते. मात्र मुलीचा या लग्नाला विरोध होता.

या विरोधामुळे मुलीचे वडील संतापले होते. त्या रागात वडिलांनी मुलीला शिवीगाळ केली, तसेच एकटी असताना पाहून मुलीच्या गुप्तांगाला हात लावून विनयभंग केला. असं तक्रारीत म्हटलं आहे.

abp ने दिलेल्या वृत्तानुसार..

जादूटोण्यासाठी महिलेचं मासिक पाळीचं रक्त विकलं

दरम्यान काल पुण्यातील महिलेचं मासिक पाळीचं रक्त जादूटोण्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. ही महिला विवाहित असून सासरच्या मंडळींनीच हे कृत्य केलं आहे. या प्रकरणी या २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.

या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २०१९ पासून सुरू होता. २७ वर्षीय पीडित महिला ही पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला आहे. २ वर्षांपूर्वी पीडित महिला आणि तिच्या पतीच्या प्रेम विवाह झाला होता. यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करायला सुरुवात केली.

सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळीदरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढून ते भरुन ५० हजारात जादूटोण्यासाठी विकलं. ही घटना या महिलेने आपल्या आईवडिलांना सांगितली, त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

ज्या दिवशी ही महिला पोलिसांकडे आली त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसंच हे अघोरी कृत्य बीडमध्ये घडलं असून गुन्हा दाखल करुन पुढचा तपास तिकडे करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही.

टॅग्स :punecrime