फ्लॅट मिळवून देण्याचा बहाणा करीत कॅबचालकाने ज्येष्ठ नागरीकास लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune crime news fraud police cab driver robbed senior citizen on pretext getting flat

फ्लॅट मिळवून देण्याचा बहाणा करीत कॅबचालकाने ज्येष्ठ नागरीकास लुटले

पुणे : मुंबईहून पुण्यात काही दिवस राहण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरीकाला फ्लॅट मिळवून देण्याचा बहाणा करुन कॅबचालक व त्याच्या साथीदारांनी 38 हजारांच्या रोख रकमेसह साडे सात लाख रुपये लुबाडले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्याततिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 77 वर्षीय जेष्ठाने (रा. सानपाडा, मुंबई) सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॅबचालक श्रीधर साहू व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन ते पाच नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरीक हे मुळचे मुंबई येथील राहणारे आहेत. कौटुंबिक कारणामुळे ते काही दिवस पुण्यात राहण्यासाठी आले होते.

30 ऑक्‍टोबर रोजी ते वाकड येथे आले. तेथील एका हॉटेलमध्ये ते राहात होते. तेथे वास्तव्य केल्यानंतर ते मोबाईलवरुन पुण्यातील वृद्ध आश्रमाबाबत माहिती घेत होते. त्यावेळी त्यांना धायरी परिसरातील एका ज्येष्ठ नागरीकांच्या केअर सेंटरची माहिती मिळाली. दरम्यान, प्रवासासाठी त्यांनी कॅबची नोंदणी केली होती, त्यातुन ते प्रवास करीत असताना त्यांची कॅबचालक साहु याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी ज्येष्ठ नागरीकाने त्याच्याशी बोलताना पुणे परिसरात वृद्धाश्रम किंवा फ्लॅट भाड्याने मिळण्याबाबत माहिती देण्यास सांगितले होते. साहू याने फिर्यादींना फोन करून प्लॅट पाहण्यासाठी जायचे असल्याचे सांगून त्यांना गाडीत बसवून हिंजवडी परिसरात नेले.

फिर्यादी देखील तेथे काही वेळ त्यांना फिरवुन शिवीगाळ करत फिर्यादींच्या खिशातील 38 हजार रुपयांची रोकड, मोबाईल, एटीएम कार्ड व त्याचा पीन क्रमांक घेतला. त्यानंतर त्यांना हिंजवाडी परिसरात सोडून दिले. फिर्यादींच्या एटीएमचा वापर करून आरोपींनी मोबाईल, कपडे करीत त्यांच्याकडील साडे सात लाख रुपये लुटले. या प्रकारामुळे फिर्यादी घाबरले होते. त्यांनी तेथून थेट मुंबई गाठली. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी आपल्या पुतण्यास दिली. त्यानंतर याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.