पुणे : गुन्हे वृत्त

सायबर चोरट्यांकडून बनावट आरटीओ चलन, लष्करी गणवेश कंत्राट व एपीके फाईलच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; गणेश पेठेत घरफोडी, कात्रजमध्ये अपघातात एकाचा मृत्यू, तेजस पिलाणे खुनातील फरार आरोपीला अखेर अटक
Cyber fraud and criminal incidents reported in Pune city today

Cyber fraud and criminal incidents reported in Pune city today

Sakal

Updated on

‘आरटीओ’चे बनावट चलन पाठवून दोघांना १४ लाखांचा गंडा

पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी दोन घटनांमध्ये दोघांची सुमारे १४ लाख १६ हजार रुपयांना फसवणूक केली. चोरट्यांनी यासाठी ‘एपीके’ फाईलचा वापर करून नागरिकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारला.

या प्रकरणी सिंहगड रस्ता आणि खराडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात घडली. येथील एका ५४ वर्षीय नागरिकाला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर एपीके फाईल पाठवली. आरटीओचा दंड भरण्याचे बनावट चलन दाखवून त्यांच्याकडून ११ लाख ६६ हजार रुपये उकळले. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अशीच दुसरी घटना खराडी परिसरात घडली असून, तिथेही आरटीओ चलनाचे आमिष दाखवून एका ४१ वर्षीय व्यक्तीची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com