Pune crime news : भाजी विक्रेत्यांना मारहाण करुन फरार झालेले सराईत गुन्हेगार हवेली पोलीसांच्या जाळ्यात

त्यावेळी आमच्या एरियात येऊन भाजी विक्री करायची नाही
अटक
अटक sakal

किरकटवाडी : आमच्या एरियात येऊन भाजी विक्री करायची नाही असे म्हणत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे दोघांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी जॅकने जबर मारहाण करणाऱ्या दोन मुख्य सराईत गुन्हेगारांना हवेली पोलीसांनी अटक केली आहे. सोन्या धोत्रे (वय 20) व मोग्या गुंजाळ (वय 20, दोघेही रा. जयप्रकाश नारायण नगर, नांदेड, सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

अटक
Crime news : बाळाची विक्री करण्याचा घाट हाणून पाडला

11 जून रोजी खानापूर (ता.हवेली) येथून दोन भाऊ टेंपो घेऊन भाजी विक्री करण्यासाठी किरकटवाडी परिसरात आले होते. त्यावेळी आमच्या एरियात येऊन भाजी विक्री करायची नाही असे म्हणत सराईत गुन्हेगार सोन्या धोत्रे,मोग्या गुंजाळ व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी त्या भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी व लोखंडी जॅकने बेदम मारहाण केली होती. भर रस्त्यावर झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हवेली पोलीसांनी भाजी विक्रेत्यांना विश्वासात घेऊन गुन्हा दाखल केला, परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते.

अटक
Sambhaji Nagar Crime news : मुलीने प्रसंगावधान राखत पळ काढला अन् ; पालकांनी धरून दिला चोप

आरोपींवर अगोदरही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हवेली उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले व हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांनी आरोपींचा कसून शोध घेण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस हवालदार निलेश राणे, विलास प्रधान व पोलीस नाईक राजेंद्र मुंढे यांनी सापळा रचून दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस नाईक अशोक तारु अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com