Pune Crime News : तीन फरारी आरोपी गजाआड;महादेव बुक सट्टा प्रकरण,तिघांना मध्य प्रदेशातून अटक

महादेव बुक आणि लोटस ३६५ ॲपद्वारे ऑनलाइन सट्टाप्रकरणी फरार झालेल्या तीन मुख्य आरोपींना शहानगर (मध्य प्रदेश) येथून अटक करण्यात आली.
Pune Crime News
Pune Crime News sakal

नारायणगाव : महादेव बुक आणि लोटस ३६५ ॲपद्वारे ऑनलाइन सट्टाप्रकरणी फरार झालेल्या तीन मुख्य आरोपींना शहानगर (मध्य प्रदेश) येथून अटक करण्यात आली. आरोपींना जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शीळीमकर यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकरणी कॉलसेंटरचालक मुख्य आरोपी राज ललित बोकरिया (वय २९, रा. शांतीसागर, जुन्नर एसटी स्टँडच्या पाठीमागे), ऋतिक सुरेश कोठारी (वय २४, रा. पद्मधन बंगलो, मांजरवाडी रस्ता, नारायणगाव), मोहमद सलमान मोहमद फारुख मिरजकर (वय ३२, रा. रो-हाउस नं. ४, ए-विंग नंदनवन सोसायटी, नारायणगाव, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नारायणगाव येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तीन मजली इमारतीत फेब्रुवारी २०२४ पासून महादेव बुक आणि लोटस ३६५ ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस उपविभागीय अधिकारी खेड यांच्या पथकाने १५ मे रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून हे प्रकरण उघडकीस आणले होते. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांसह ९९ आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी ९६ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र तीन मुख्य आरोपी फरार होते.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने राज बोकरिया, ऋतिक कोठारी, मोहमद मिरजकर या तीन जणांना मध्य प्रदेश येथे अटक केल्याने प्रत्यक्ष दर्शनी सहभागी असलेल्या ९९ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तीन आरोपी अल्पवयीन

या प्रकरणी ९९ पैकी ८८ आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असून, पाच आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. तीन अल्पवयीन आरोपींना पुणे येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. आज अटक केलेल्या तीन आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com