Pune Crime : डोक्यात खोरे घालून आईचा खून : मुलाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime News

Pune Crime : डोक्यात खोरे घालून आईचा खून : मुलाला अटक

नारायणगाव : तंबाखू खाण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईच्या डोक्यात खोरे घालून खून केला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी शिरोली तर्फे आळे(ता.जुन्नर) येथे घडली. या प्रकरणी आरोपीला आज रात्रीअटक करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

आई अंजनाबाई बारकु खिल्लारी (वय ६० ,राहणार शिरोली तर्फे आळे, ता.जुन्नर) यांचा खून केल्या प्रकरणी मुलगा अमोल बारकु खिल्लारी (वय २३) याला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबतची फिर्याद आरोपीचे वडील बारकू सखाराम खिलारी (वय ६६ ) यांनी दिली आहे.

या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे म्हणाले आज दुपारी दीड ते तीनच्या दरम्यान आरोपी अमोलने आईकडे तंबाखूसाठी पैशाची मागणी केली .या वेळी माझ्याकडे पैसे नाहीत असे आई अंजनाबाई खिल्लारी यांनी सांगितले.

या वेळी अमोलने मी घर सोडून जाईल अशी धमकी त्याने आईला दिली. आईने तुला कुठे जायचे तिकडे जा असे सांगितले. या मुळे राग अनावर झाल्याने अमोलने घरातील खोरे आईच्या डोक्यात मारले. वर्मी घाव बसल्याने अंजनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. नारायणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आरोपीला अटक केली.