Crime News : पाबे गावातील तरुणाचा खुन pune Crime News Pabe village Murder young man | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे

Crime News : पाबे गावातील तरुणाचा खुन

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील घटना ऐन होळीच्या दिवशी पाबे गावातील तरुण नवनाथ ऊर्फ पप्पूशेठ नामदेव रेणुसे (वय.३८) याचा वेल्ह्यात विसावा हॉटेल मध्ये गोळ्या झाडून तोंडावर धारधार शस्त्र (सत्तुर,चाकुने,कुकरी ) ने वार करून निघृण खुन केला आहे.

आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन आरोपी हे खुन झालेल्या तरुणाच्या गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती वेल्हे पोलीसांकडून मिळाली आहे.

खुन झालेल्या तरुणावर चार गोळ्या झाडल्या असुन आरोपींचा शोध चालु असुन पूर्ण तालुक्यात नाकाबंदी केली असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली.