Parents sell 40-day-old baby girl for Rs 3.5 lakh In Pune : पैशासाठी आई-वडिलांनी ४० दिवसांच्या बालिकेची ३.५ लाख रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या पुण्यात ही घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली आहे. मीनल ओंकार सपकाळ (२९, रा. बिबवेवाडी), ओंकार औदुंबर सपकाळ (२९, रा. बिबवेवाडी), अशी या आईवडिलांची नावं आहेत.