esakal | सराईत गुन्हेगाराची घरफोडीची 'सेंच्युरी'; गुन्हे शाखेकडून अटक

बोलून बातमी शोधा

thief
सराईत गुन्हेगाराची घरफोडीची 'सेंच्युरी'; गुन्हे शाखेकडून अटक
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पुणे- क्रिकेटमध्ये धावांचे शतक ठोकले जाते हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. पण एखाद्या सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीच्या गुन्ह्यांची "सेंच्युरी' होऊ शकते का ? तर त्याचे उत्तर हो असे आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्यास अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एक, दोन नव्हे तर तब्बल 100 गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. रमेश महादेव कुंभार (वय 43, रा. काल्हेर, भिवंडी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2016 मध्ये घरफोडीचे गुन्हे घडले होते. त्यातील सराईत गुन्हेगार भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकास मिळाली होती.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना तातडीने फायर ऑडिटचे आदेश

पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी कुंभारला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 9 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याच्याविरुद्ध शहरात विविध पोलिस ठाण्यात चार गुन्हे आहेत. त्याचबरोबर त्याने साथीदारांच्या मदतीने पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, नाशिक शहरांमध्ये 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बंद घरांची पाहणी करून सुरक्षारक्षक नसल्याची खात्री केल्यानंतर तो कटावणीच्या सहाय्याने घरांचे कुलूप तोडत त्यानंतर तेथे चोरी करीत होता. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, यशवंत आंब्रे, कादीर शेख, समीर पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली.