Pune News: महिलेला मारहाण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे अखेर निलंबन, गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News

Pune News: महिलेला मारहाण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे अखेर निलंबन, गुन्हा दाखल

Pune crime news: पुण्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या त्या घटनेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. एका महिलेला पोलीस कॉन्स्टेबलनं मारहाण केली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्या महिलेनं आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर केला होता.

महिलेनं याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता त्या पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पुण्यातील मंडईमध्ये बांगड्यांचं दुकान चालवणाऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली होती. त्यात पोलिस कॉन्स्टेबलचा सहभाग होता. असा आरोप त्या महिलेनं केला होता. त्या मारहाणीमध्ये महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती.

हेही वाचा: कबुतराचं मुंडकं धरलं अन् तोंडचा घास पळवला; चिमुकलीचा Video Viral

त्याचं झालं असं की, महिलेनं पोलीस कॉन्स्टेबलला नो पार्किंगमध्ये गाडी लावण्यास विरोध केला होता. त्यामुळे तिला मारहाण करण्यात आली होती. राहुल शिंगे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून त्याच्यावर आता निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.

हेही वाचा: Viral Photos : कडेवर बसून निघाली नवरदेवाची वरात, अडीच फूटाचा नवरा अन् तीन फूटाची नवरी