Pune Crime News
Pune Crime News

Pune Crime News: पुणे पोलिसांनी लढवली शक्कल, कोंढव्यात आरोपीची काढली धिंड

Pune Crime News: पुण्यातील कोंढवा परिसरात एकावर खुनी हल्ला करून तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला शोधून त्याची परेड काढण्यात आली. मंगेश अनिल माने ऊर्फ मंग्या (26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोयता असो किंवा इतर गुन्हे पोलिसांकडून आता आरोपींची धिंड काढण्यात येणार आहे.

या प्रकरणात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास रोहित खंडाळे हा तरुण कोंढव्यातील साईनगर येथे फिरत होता.

त्या वेळी मंगेश याने त्याच्या साथीदारांसह, सागर जाधव, पवन राठोड, सुरज पाटील, अभिजित दुधणीकर त्याला अडविले. रोहित हा त्याचा मित्र वैभव साळवे याच्याबरोबर फिरत असल्याने त्यांनी शिवीगाळ करून लोखंडी कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला

Pune Crime News
Ajit Pawar Mumbai NCP: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष नेमला!

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली. मात्र, मंग्या फरार झाला होता. अखेर त्याला अटक करण्यात आली. (Pune Crime News)

Pune Crime News
MP Amol Kolhe : दादांचा एकनिष्ठ शिलेदार साहेबांच्या गटात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com