Pune Crime : कात्रजमध्ये टोळक्याचा हल्ला; तरुणावर शस्त्राने वार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Katraj Sukhsagarnagar assault case Pune : कात्रजच्या सुखसागरनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर शस्त्राने हल्ला केला. डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले. बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज परिसरातील सुखसागरनगरमध्ये घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तीन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.