Pune Crime : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Pune robbery accused arrested : मागील एक वर्षापासून फरार असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ४० हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून आणखी एका गुन्ह्यात त्याचा सहभाग उघड झाला आहे.
पुणे : मागील एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक करत गुन्ह्याचा छडा लावला. आरोपीकडून ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.