Pune Crime : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी गजाआड
Pune robbery gang arrested : कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नागरिकांना धमकावून लुटणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखा युनिट-चारने अटक केली. येरवडा परिसरातील घटनेप्रकरणी साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे : कारमध्ये लिफ्ट दिल्यानंतर धमकावून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीतील तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-चारच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.