Pune Crime News : सिंहगड एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीचा Video बनवला; प्रवाशांनी शिक्षकाला धू-धू धुतलं

गाडीतील तिकीट पर्यवेक्षकांनी त्याला कल्याण स्थानकावर कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.
Sinhgad Express
Sinhgad ExpressSakal
Updated on

पुणे, ता. ६ : पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ बनविणाऱ्या एका शिक्षकास कर्जत लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्या शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मोहम्मद अश्रफ असे आरोपीचे नाव आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी पुणे ते कर्जत दरम्यान घडली. सिंहगड एक्सप्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती महिलांचे लपून व्हिडिओ काढत होता. तसेच काही महिलांची छेड काढल्याची घटनाही घडली होती. बिहार येथील एका मदरसामध्ये शिक्षक असणारा मोहम्मद अश्रफ (वय २६, सीतामढी, बिहार) हा गुरुवारी मदरस्याच्या कामासाठी पुण्याहून मुंबईला जात होता.

Sinhgad Express
Cyber Crime : युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं अन् खटक्यात उडले ८ लाख रुपये; तुमच्यासोबतही 'हे' होऊ शकतं

गुरुवारी सकाळी आरोपी मोहंमद अश्रफ हा व्हिडिओ करीत असल्याचे काही महिला प्रवाशांच्या लक्षात आले. त्यावरून काही प्रवाशांनी त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर गाडीतील तिकीट पर्यवेक्षकांनी त्याला कल्याण स्थानकावर कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.

मात्र घटना कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी शून्य क्रमांकावर नोंद करून तो गुन्हा कर्जत लोहमार्ग पोलिसांकडे हस्तांतर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sinhgad Education Society Faces Criminal Case Over Alleged Salary Embezzlement
Minor Harassment Allegations: POCSO Case Filed Against Doctor's Son-in-Law in Solapur
Viral Video
Kalyan Crime
Marathi News Esakal
www.esakal.com