Crime News : तक्रार घेण्यासाठी लाच मागणारे तीन पोलिस हवालदार ‘ॲन्टीकरप्शन’च्या जाळ्यात

 police bribed
police bribed esakal
Updated on

पुणे : मोटार अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस हवालदारांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका पोलिस हवालदाराला अटक केली आहे.

 police bribed
Onian Rate: शेतकऱ्यांच्या मदतीला KCR धावले! महाराष्ट्राच्या कांद्याला तेलंगणाने दिली दराची हमी

राजेंद्र दीक्षित, जयराम सावलकर आणि विनायक मुधोळकर अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी राजेंद्र दीक्षित यांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय २४) यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या मोटारीला झालेल्या अपघाताची तक्रार करण्यासाठी ते पोलिस ठाण्यात गेले.

त्यावेळी तिघा पोलिस हवालदारांनी त्यांच्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानुसार पडताळणी करून ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात सापळा रचला.

पोलिसांनी तक्रारदाराची मध्यरात्री तक्रार दाखल करुन घेतली. त्यानंतर पोलिस हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून १३ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी ‘एसीबी’च्या पथकाने दीक्षित याला ताब्यात घेतले. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, मुकुंद अयाचित, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर, पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली.

 police bribed
Abdul Sattar : कृषी विभागाच्या धाडी बोगस?, दिपक गवळी कोण? सत्तारांनी स्पष्ट सांगितले

येरवडा पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर

एखाद्या नागरिकावर अन्याय झाल्यानंतर ते तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे जातात. परंतु तक्रार दाखल करून घेण्यासाठीच लाच मागितल्याचा आश्चर्यजनक प्रकार येरवडा पोलिस ठाण्यात समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दाद कोठे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तक्रार करण्यासाठी संपर्क साधा-

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय -

मोबाईल क्रमांक- ९९२३११५०५०

दूरध्वनी क्रमांक- ०२०- २६१३२८०२

ई-मेल dyspacbpune@gmail.com

टोल फ्री क्रमांक- १०६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com