esakal | पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

 अटक

पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नाशिक येथून विक्रीसाठी गांजा घेऊन येणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने वाघोली-लोहगाव रस्त्यावर पकडले. त्यांच्याकडून 71 किलो गांजा व टेम्पो असा 14 लाख 35 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला.

प्रविण बाळासाहेब वायसे (वय 31, रा. उत्तमनगर, नाशिक), योगेश शशिकांत महाजन (वय 25, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायसे याचा स्वतःच्या मालकीचा टेम्पो आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल भरून तो बाहेरील राज्यात पोहचविण्याची तो कामे करतो.

तर, महाजन हा त्याच्यासोबत टेम्पोवरच काम करतो. दरम्यान, टेम्पोमधून दोघांनी विशाखापट्टणम येथुन गांजा आणला असून ते नाशिक येथून गांजा विक्री करण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांना मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून वाघोली-लोहगाव रस्त्यावर पकडले. त्यावेळी त्यांच्या टेम्पोमध्ये गांजा असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 71 किलो गांजा व टेम्पो असा 14 लाख 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.

loading image
go to top