
पुणे : घरफोडी करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या पोलिस तपास पथकाने अटक करत त्याच्याकडून आठ गुन्ह्यांची उकल केली. त्याने चोरीच्या पैशांमधून एक मोटारदेखील खरेदी केली असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाइल व मोटारीसह असा १४ लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.