Pune Crime : आंबेगाव परिसर अनधिकृत वेश्या व्यवसाय, अनधिकृत लॉजिंग व्यवसायिकांना मनसेचा खळखट्याक'चा इशारा

कात्रज नवलेपूल बाह्यवळण मार्गावरील सीलाई वर्ल्ड ते नावळेपूल दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत आहेत
pune crime police ambegaon Prostitute Business Lodging Warning of MNS
pune crime police ambegaon Prostitute Business Lodging Warning of MNSsakal

आंबेगाव : आंबेगाव बुद्रुकचा हाय प्रोफाईल परिसर असलेल्या कात्रज नवलेपुल बाह्यवळण मार्गावर सुरू असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर योग्य ती कार्यवाही करून बंद करणे संदर्भात स्थानिक नागरिकांनी पोलीस तसेच महापालिका प्रशासनाकडे वारंवार साकडे घातले.परंतु याठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसाय अद्याप सुरूच आल्याचे चित्र दिसते आहे.

कात्रज नवलेपूल बाह्यवळण मार्गावरील सीलाई वर्ल्ड ते नावळेपूल दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या राहत आहेत.त्यामुळे स्थानिक गृहिणी,शाळकरी विद्यार्थीनी,महाविद्यालयीन तरुणी तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणाऱ्या महिलांना सदरील ठिकाणी प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.

बाबजी पेट्रोल पंप जवळील लोटस पार्क सोसायटी, स्प्लेंडर सोसायटी,मोक्षांगण सोसायटी आदी सोसायट्यातील महिलांनी मनसे सरचिटणीस तथा माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे सदरील वेश्या व्यवसाय बंद करण्यात यावा अशी तक्रार केली.

त्यानंतर मोरे यांनी कात्रज नवले पुल बाह्यवळण मार्गावर असणाऱ्या लॉज चालक आणि मालकांना निवेदन देवून अनधिकृत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायास खतपाणी घालून येथील स्थानिक महिलांना त्याचा उपद्रव होऊ नये यासाठी निवेदन देवून विनंती करण्यात आली.

निवेदनाची योग्य दखल लॉज चालक आणि मालकांनी घेऊन अनधिकृत वेश्या व्यवसाय आपल्या लॉजमध्ये सुरू ठेवला तर मनसे स्थानिक महिलांना घेवून हॉटेलवर 'खळखट्याक ' मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे नेते मोरे यांनी दिला.यावेळी मंगेश रासकर,नितीन जगताप आदी मनसैनिकांसह स्थानिक महिला उपस्थित होत्या.

' आंबेगाव परिसरात असलेल्या अनधिकृत लॉजवर सुरू असलेला वेश्या व्यवसायाला संबंधित लॉज चालक मालकांनी खतपाणी घालणे बंद करावे.परिसरातील महिलांची याप्रकरातून कुचंबणा होते आहे.हे प्रकार बंद झाले नाहीतर मनसे खळखट्याक स्टाईलने आंदोलन करेल.

-वसंत मोरे,मनसे नेते

' परिसरात सुरू झालेल्या गैरप्रकाराने स्थानिक त्रस्त झाले आहेत.यासंबंधी खासदार सुप्रिया सुळे यांची स्थानिक महिलांची भेट घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या होत्या.परंतु कार्यवाही मात्र झाली नाही.

-अनिल कोंढरे ,माजी उपसरपंच आंबेगाव बुद्रुक

' आम्हाला रस्त्यावर रिक्षा किंवा बसने प्रवास करण्यासाठी सदरील रस्त्यावर उभे राहावे लागते.परंतु येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला रस्त्यावर उभ्या असतात त्यामुळे आम्हालाही लोक वाइट नजरेने काहीही विचारतात.

- महिला , लोटस पार्क सोसायटी आंबेगाव

' आम्ही स्थानिक लोकप्रतनिधी,आमदार खासदार यांचेसह महापालिका आणि पोलीस प्रशनासही पत्र व्यवहार आणि निवेदने दिली आहेत. पण त्याचा काहीही उपयोग होत नाही

- सागर देशमुख ,चेअरमन लोटस पार्क सोसायटी

' भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नव्वद टक्के वेश्या व्यवसाय बंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.शिवाय आपल्या ठाण्याकडून तीन चार वेळा सदरील परिसरात पेट्रोलिंग करण्यात येते आहे.बाह्यवळण मार्गावरील काही लॉज मालकांवर गुन्हेही दाखल केले आहेत.

- विजय कुंभार ,निरीक्षक भारती विद्यापीठ पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com