
विधिमंडळातील हाणामारीचे प्रकरण ताजे असतानाचा पुण्यात एका सराईत गुंडाने पोलिस स्टेशनमध्ये तोडफोड करत रात्रभर राडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुंडाची मजल पोलिस स्टेशनमध्येच पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली. त्याने पोलिसांच्या तोंडावर मिर्चीचा स्प्रे मारल्याने चार ते पाच पोलिस कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्यात पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य पुणेकरांनी कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल नागरिकांनी केला आहे.