
Latest Pune News: पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्दळीच्या स्वारगेट एसटी स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली. पोलिस आरोपीच्या मागावर आहेत. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेटला आली होती. दत्तात्रय रामदास गाडे नावाच्या तरुणाने तिला फसवून अंधारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसवले यानंतर बसचा दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकार समोर आल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट स्थानकातील ऑन ड्यूटी कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे.