
Pune Crime
Sakal
सुनील जगताप
थेऊर : पतीपासून अलिप्त राहत असलेल्या परित्यक्ता महिलेशी शादी डॉट कॉम साईटवर ओळख केली.त्यानंतर एकांतात बोलण्याच्या बहाण्याने भेटण्यास बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील एका लॉजवर २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.तसेच वारंवार शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आरोपीने महिलेला धमकी दिल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.