
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असलेला आणि नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने पवित्र झालेल्या आणि पुण्यातील सिंहगडावर सर्वांची मान शरमेने जाईल अशा प्रकार घडला असून शिवप्रेमींसह सामान्य लोकांमध्ये यामुळे संतापाची लाट आहे. या पवित्र किल्ल्यावर एका परदेशी तरुणाला काही टवाळखोरांनी अश्लील शिव्या शिकविल्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरु आहे.