अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परदेशी व्यक्तींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

कोंढवा आणि उंड्री परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परदेशी व्यक्तींना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

Pune Crime : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परदेशी व्यक्तींना अटक

पुणे - कोंढवा आणि उंड्री परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघा परदेशी व्यक्तींना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून ११ लाख रुपयांचे कोकेन आणि इडुलिस खत हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी-१ पथकाने २१ मार्च रोजी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथील ॲस्टोनिया सोसायटीजवळ सार्वजनिक ठिकाणी एका परदेशी नागरिकाला (वय ५२, रा. भवानी कॉम्प्लेक्स, वडाची वाडी) पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे २३ ग्रॅम कोकेन आढळून आले.

तसेच, कोंढवा बुद्रूक येथील सोमजी बसस्टॉपजवळ अन्य एका परदेशी तरुणाच्या (वय २९, परफेक्ट फॉर्च्युन सोसायटी, कोंढवा बुद्रूक) घरावर छापा टाकला. या वेळी त्याच्या घरातून आठ किलो ३९३ ग्रॅम इडुलिस खत हा अमली पदार्थ जप्त केला. त्याची किंमत पाच लाख ८७ हजार रुपये आहे. तसेच, दोन लाख ७० हजार रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. आरोपींना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.