
कल्याणमध्ये तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. राजगुरुनगरमध्ये दोन लहान बहिणींची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी या मुली घराबाहेर खेळत असतानाअचानक बेपत्ता झाल्या. पालकांनी त्यांचा शोध घेतला पण त्या आढळून आल्या नाहीत. रात्री शहराबाहेर एका इमारतीच्या बाजूला ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्या. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.