मंडई मेट्रो स्टेशन परिसरात मोकळ्या जागेत एका ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर वारकरून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. खून केल्यानंतर आरोपी पुण्याबाहेर पळून गेला होता. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.