मोबाईल दुकानावर दरोड्याच्या तयारीतील तडीपारासह पाच अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune crime update Five arrested robbery at mobile shop undri

मोबाईल दुकानावर दरोड्याच्या तयारीतील तडीपारासह पाच अटकेत

उंड्री : फुरसुंगी (ता. हवेली) येथील मोबाईल दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीतील तडीपार गुंडासह पाचजणांना गुन्हे शाखा युनिट- च्या पथकाने जेरबंद केले आहे. पुणे- सासवड रोडवरील फुरसुंगीच्या रेल्वे उड्डाण पुलाखाली आरोपींना सापळा रचून अटक केली. शिवराज ऊर्फ सुरज अर्जुन वाडेकर (वय २४), संतोष राजू गायकवाड (वय २६), दत्ता गणेश गायकवाड, अविनाश ऊर्फ चार्ली सिद्राम जाधव (वय २९), लखन सुभाष जाधव (वय ३०, सर्व रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अजय गायकवाड यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे युनिट ५ चे पथक सोमवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना पुणे- सासवड रोडवरील फुरसुंगी ओव्हर ब्रीज खाली काही जण जमले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कोयते, कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, मिरची पावडर, नायलॉन दोरी व इतर साहित्य आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले. तेथून काही अंतरावर असलेल्या जगदंब मोबाईल शॉपीचे हे दुकान बंद होण्याअगोदर दुकानात घुसून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.सहायक पोलीस निरीक्षक लोणारे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pune Crime Update Five Arrested Robbery At Mobile Shop Undri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top