
पती आणि त्याच्या प्रेयसीच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १० मे रोजी दुपारी घडली असून माधुरी विकास कोकणे अस आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विकास बाळासाहेब कोकणे (वय ३७, रा. सादर) आणि प्रियसी अर्चना अहिरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.