
पुण्यात संगणक अभियंता सौरभ आठवले याचा निर्घृण खून मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून झाला.
अल्पवयीन प्रियकराने तीन मित्रांसह सौरभला जबरदस्तीने डोंगरावर नेऊन धारदार शस्त्रांनी हत्या केली.
राजगड पोलिसांनी आरोपींना अटक करून हत्यारे, दुचाकी आणि मोबाईल जप्त केले असून तपास सुरू आहे.
पुण्यातील मांगडेवाडीतील संगणक अभियंत्याचा मृतदेह भोरमधील शिंदेवाडीत आढळल्याने एकच खळबळ माजली होती. दरम्यान मानलेल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणातून त्याचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराला अटक केली आहे. सौरभ स्वामी आठवले ( २५) असे या मृत अभियंत्याचे नाव आहे.