esakal | नऊ लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

ransom

पुणे : नऊ लाख रुपयांची खंडणी घेणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बॅंकेतील कर्ज प्रकरण मंजुर करून घेण्यासाठी एका व्यक्तीने व्यावसायिकाला दिलेल्या साडे तीन लाख रुपयांच्या बदल्यात त्याच्याकडून नऊ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अटक केलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.

हेही वाचा: सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाचं आगमन;पाहा व्हिडिओ

तुषार बाळासाहेब बधे (वय 31, रा. सुयश अपार्टमेंट, धायरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत किशोर अहिवळे (रा.निगडी) यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिवळे यांची आयटी कंपनी होती. मात्र कोरोनामुळे त्यांची कंपनी बंद पडल्याने ते स्टेट बॅंकेच्या कर्ज प्रक्रिया व ग्राहक कर्ज प्रक्रियेची कागदपत्रे बॅंकेत जमा करण्याचे काम करीत होते.

हेही वाचा: सुबोध भावेचा बाप्पा : 'टोकियो ऑलिम्पिक 2020"चा हटके देखावा ; पाहा व्हिडिओ

वाल्मिकी तुपे नावाच्या व्यक्तीने अहिवळे यांना त्यांचे कर्ज प्रकरण मंजुर करून घेण्यासाठी साडे तीन लाख रुपये दिले. मात्र त्यांच्या कर्ज प्रकरणात त्रुटी आढळल्याने त्यांचे कर्ज मंजुर होऊ शकले नाही. त्यामुळे तुपे यांनी अहिवळे यांना दिलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्यांनी तुपे यास 75 हजार रुपये परत केले, तर उर्वरीत रक्कमही हळूहळू परत करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, तुषार बधे याने फिर्यादीस फोन केला. "मी वाल्मिकी तुपेचे भाऊ आहे, तुपेचे पैसे मला परत करायचे, अन्यथा घरातील सर्व साहित्य नेऊन घराला कुलूप लावेल. आईलाही घराबाहेर फेकून देईल' अशा शब्दात धमकी दिली. त्यानंतर त्याने अहिवळे यांच्याकडे नऊ लाखांची खंडणी मागत त्यांना जीवे मारण्याची वारंवार धमकी देऊ लागला.

हेही वाचा: मनोहरमामा तुरुंगाच्या वाटेवर;पाहा व्हिडिओ

या सगळ्या प्रकाराला कंटाळून त्यांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार अर्ज केला. त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्याच्या खंडणी विरोधी पथकास सुचना दिल्या. त्यानुसार, अहिवळे यांनी बधे यास नऊ लाख रूपयांची खंडणी घेण्यसाठी लष्कर परिसरातील डायमंड हॉटेल येथे गुरूवारी रात्री साडे आठ वाजता बोलाविले. अहिवळे यांच्याकडून बधे हा खंडणी घेत असतानाच सापळा रचून बसलेल्या विरोधी पथकाच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यास अटक केली. बधे हा पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. खुनाच्या गुन्ह्यातुन तो नुकताच कारागृहाबाहेर आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हि कारवाई केली.

loading image
go to top