
Pune Cyber Crime
Sakal
पुणे : ‘तुमच्या मोबाईल सिमकार्डवरून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले आहेत. पोलिसांत याबाबत तक्रार आली आहे...’ अशी भीती दाखवत सायबर चोरट्यांनी डेक्कन परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.