

Pune 22 crore share market cyber fraud case
sakal
पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाकडून उकळलेले २२ कोटी रुपये आरोपींनी सात बँक खात्यातून विविध बँक खात्यात पाठवले आहेत. या बँक खात्यातून जवळपास ८० हजार बँक व्यवहार झाल्याचे राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवरील तपासात आढळून आले आहे. ही रक्कम राज्यासह परराज्यात आणि परदेशात पाठविण्यात आली आहे.