Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांकडून ४५ लाखांची फसवणूक, दोन गुन्हे दाखल
Online Scam : पुण्यात सायबर चोरट्यांनी शेअर गुंतवणूक व घरबसल्या नोकरीच्या आमिषाने दोन नागरिकांची ४५ लाखांची फसवणूक केली असून, खडक व आंबेगाव पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.
पुणे : शहरात दररोज सरासरी तीन ते चार सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले जात आहेत. सायबर चोरट्यांनी दोन घटनांमध्ये नागरिकांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शहरातील खडक आणि आंबेगाव पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.