Pune cyber fraud coordination portal: ‘समन्वय’ पोर्टलच्या मनी ट्रेलमुळे पुण्यात ५ सायबर फसवणुकींचा भंडाफोड; ३ कोटी ६० लाखांचा व्यवहार उघड

‘समन्वय’ पोर्टलच्या मनी ट्रेल विश्लेषणातून पुण्यातील पाच सायबर फसवणुकींचा पर्दाफाश; सात नागरिकांना तब्बल ३ कोटी ६० लाखांचा फटका
The Samanvay portal helps investigators trace mule accounts and suspicious banking transactions across multiple states.

The Samanvay portal helps investigators trace mule accounts and suspicious banking transactions across multiple states.

sakal
Updated on

पुणे : केंद्र सरकारच्या ‘समन्वय’ पोर्टलवरील मनी ट्रेल विश्लेषणातून पुणे शहरात सायबर फसवणुकीशी संबंधित पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींनी स्वतःच्या नावाने विविध बँकांमध्ये खाती उघडून देशभरातील सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम स्वीकारत ती पुढे अन्य खात्यांमध्ये वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणांमध्ये देशातील सात नागरिकांची एकूण तीन कोटी ६० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, पाच गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com