

Pune Cyber Crime
sakal
पुणे : शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटींहून अधिक रकमेच्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणात सायबर पोलिसांनी चार आरोपींना नुकतीच अटक केली होती. त्यानंतर धागेदोरे शोधत पोलिसांनी आणखी चौघांना अटक केली असून, सव्वातीन कोटी रुपये गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांचा समावेश आहे.