
Cyber Scam
sakal
पुणे : भरघोस परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी पुण्यातील तीन नागरिकांना तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातला. हडपसरमधील एका व्यावसायिकास तीन कोटी ६६ लाख रुपये, मांजरीतील एका तरुणास ३४ लाख ५२ हजार रुपये, तर कोंढव्यातील एका व्यक्तीस १२ लाख ९० हजार रुपये असा एकूण चार कोटी १३ लाख रुपयांचा फटका बसला. तिन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत.