Dadoji Konddev statue: ''पुण्यात दादोजी कोंडदेव-गडकरींचा पुतळा पुन्हा बसवा'', सकल ब्राह्मण समाजाची मागणी; शिवसंग्रामचा विरोध

Political and social tensions rise in Pune over demands to reinstall historic statues: लाल महलात दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याला विरोध झाल्याने तो पुतळा हटवून पु. ल. देशपांडे उद्यानातील एका खोलीत ठेवण्यात आला आहे.
Ram Ganesh Gadkari statue

Ram Ganesh Gadkari statue

esakal

Updated on

Pune Latest News: पुण्यातल्या लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यात आला होता, तर छत्रपती संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला होता. गेले अनेक वर्षे हे पुतळे बंद खोलीत ठेवण्यात आले आहेत. त्यांचे पुतळे सन्मानाने शहरात बसविण्यात यावेत, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाने महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे केली आहे. तर हे दोन्ही पुतळे लाल महाल व संभाजी उद्यानात बसविण्यास शिवसंग्रामसह शिव-शंभूभक्त संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com